सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हिडिओ शूट केला कोणी?

सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हिडिओ शूट केला कोणी?
  • MG News
  • जुलै 21 2025

Share on  

विधिमंडळाच्या सभागृहात एकीकडे ऑनलाइन गेमिंगमुळे युवापिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी करणे तर दुसरीकडे सभागृहातच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऐन अधिवेशनात मोबाइलवर रमी खेळत असल्याने त्यांना धारेवर धरले जात आहे.

विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करून कोकाटेंवर आरोप केला आहे की दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असलेल्या राज्याचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याची टीका केली. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली आहे. विधिमंडळाच्या सभागृहातच राज्याचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे विरोधकांना आयते कोलीत हातात दिले आहे. गेल्या काही दिवसात फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम, माजी मंत्री संदीपान भुमरे, आजी-माजी मंत्री या-ना त्या कारणाने अडचणीत आले असतानाच आता त्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाची भर पडली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला कोकाटेंनी या मधून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, युट्यूबवरून खालच्या सभागृहाचे थेट प्रक्षेपण पाहत होतो ज्या मोबाइलवर जंगली रमीची जाहिरात आली. ती स्कीप करीत असताना व्हिडिओ शूट झाला, असे सांगितले. पण सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हायरल झालेला व्हिडीओ शूट केला कोण महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.


कोकाटेंचा हा व्हिडीओ नेमका कोणी शूट केला? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण राजकीय वर्तुळात असा अंदाज लावला जात आहे की, व्हिडीओ सत्ताधारी पक्षातील (घरचा भेदी) शूट केला असावा. सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी विरोधातच तो व्हिडीओ बाहेर काढून गोंधळ निर्माण केला आहे. तर काहीजणांच्या मते, हा व्हिडीओ मुद्दाम राजकीय डावपेचाचा भाग म्ह्णून लीक करण्यात आला असू शकतो.

संबंधित बातम्या