परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महादेव मुडें हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सुप्रिया सुळे यांचा देखील मला सपोर्ट आहे, आत्ताच त्यांनी कॉल केला होता. मला सांगितलं बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे धनंजय मुंडे यांचा बंगला आहे आणि त्यावर कारभार सर्व वाल्मीक कराड सांभाळतो. म्हणजे वाल्मीक कराडचा फोन गेला. म्हणजेच १००% वाल्मीक कराडने फोन करून तपास थांबवला. आता जशी मी खोलात गेले तसे मला समजले की प्लॉटच्या वादातून माझ्या नवऱ्याची हत्या झाली. ती वाल्मीक कराड यांनी घडवून आणली. असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.
ज्यावेळी मला डिस्टर्ब झालं त्यावेळी माझ्या वडिलांपासून निरोप आला कि, ती जमीन मी ताईच्या नावावर करतो आणि मीडिया बंद करा. माझे वडील म्हणाले तुझ्या घरातील एक माणूस मला मारू दे नंतर माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करतो तुला चालेल का? हि ऑफर आली पण आम्ही ती फेटाळली. माझं कुंकू गेलं आहे. मला करोडो जरी दिले तरी माझं कुंकू परत येणार आहे का? माझं कुंकू जर परत येणार असतं तर मी त्यांची ऑफर मान्य केली असती. माझा नवरा ते परत आणून देणार आहेत का? त्यामुळे आम्ही ती ऑफर फेटाळली. आमच्या न्यायाचा जो लढा आहे तो आम्ही सातत्याने लढत राहणार. आरोपी जोपर्यंत फाशीवर जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार असेही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.