जिंदाल प्रकल्प गुंडाळला जाणार ?

जिंदाल प्रकल्प गुंडाळला जाणार ?
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

तब्बल ५६ तासानंतर  इगतपुरी तालूक्यातील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीची  आग विझल्यानंतर, आता विविध शासकीय यंत्रणांकडून आगीबाबत कंपनीची चौकशी करण्यास  सुरवात झाली आहे. मात्र  औद्योगिक सुरक्षा विभागाच्या वतीने कंपनीला ‘क्लोजर’ नोटीस बजावण्यात आली आहे.
सन २०१३ आणि २०२३ मधील आगीच्या घटनेनंतर पुन्हा असी घटना घडु नये म्हणून जिंदाल पॉलिफिल्म्स  कंपनीची फायर ऑडिट अहवालासह औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नियमित तपासणी केली जाते.  त्यासोबतच आढळलेल्या त्रुटींचे शेरे नोंदवले जातात.मात्र कंपनी प्रशासनाकडून या त्रुटींची पुर्तता करण्याबाबत हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळेच जिंदाल तिसऱ्यांदा आगीत खाक झाल्याचे  निरीक्षण शासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्या आधारेच क्लोजर नोटीस पाठवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या