राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार

राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार
  • MG News
  • डिसेंबर 23 2024

Share on  

मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आठवड्याच्या अखेरीस राज्यभरात थंडीमध्ये वाढ होणार आहे. याच काळात दक्षिणेकडून बाष्पीयुक्त वारे राज्यात येणार आहे. बाष्पयुक्त हवा आणि थंड वाऱ्याच्या घुसळणीमुळे विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक येथे गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या