हदगावच्या निवघा व तामसा येथे नव्याने होत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांच्या जागेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी पाहणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हदगाव तालुक्यातील मौजे तामसा व निवघा बातार या दोन ठिकाणी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने हदगाव तालुक्यातील निवघा (बा.) व तामसा येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी व जमीन अधिग्रहन बाबत माहिती घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके हे नांदेड हदगांव तालुक्याच्या दोऱ्यांवर आले असता त्यांनी हदगावच्या निवघा बा व तामसा या दोन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केली. लवकरचं या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.