आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावरील रहिवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पक्क्या रस्त्याअभावी पावसाळ्यात रुग्ण व पारधी बांधवांना चिखलातून वाट काढावी लागत असून, यंदाच्या पावसामुळे अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि घरकुल योजनेंतर्गत नवीन घरे बांधून देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. चिखल आणि पाण्यामुळे मुलांना शाळेत जाणे, रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवणे आणि दैनंदिन गरजांसाठी बाजारात जाणे जवळपास अशक्य आहे.