येवला: पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

येवला: पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या.

 त्यानुसार पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत येवला तालुक्यातील आंबेगाव येथून ऋषिकेश मोतीराम माळी व निफाड तालुक्यातील मरळगोई येथून सोपान निवृत्ती जगताप या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस मिळून आली आहे. पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या