भाजी खरेदीला गेलेल्या तरुणाचा वडीलांसमोरच खून झाल्याची घटना पंचवटीत घडली आहे.नंदकुमार दास (१९) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सितागुंफा रोडवरील परदेशी भवन येथे रहात असे. नंदकुमार बुधवारी आठवडी बाजारात भाजी खरेदीसाठी गेला असता, गाडगे महाराज पुलाजवळील स्वच्छतागृहासमोरून जात असताना, सराईत गुन्हेगारांनी पैशावरुन वाद घातला .वादाचे पर्यवसन पुढे माराहाणीत झाले या मारहाणीत अति रक्तस्त्राव होवून नंदकुमार मृत पावला . घटनेनंतर गुन्हेगार पसार झाले.पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत.