कडबा मशीन मध्ये अडकून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू-
कडबा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कुट्टी मशिनमध्ये अडकल्यानं मृत्यू झाल्याच्या अनेक भयानक घटना आजवर समोर आल्या आहेत. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.
शिरपूर तालुक्यातील बोरगाव शिवारात ही दुर्घटना घडली असून यामध्ये १४ वर्षीय अल्पयीन मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालयातील वॉर्डबॉय शिवाजी पाटील यानं खबर दिल्यानं शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रदीप जामला पावरा असं मयत मुलाचं नाव आहे.
शिरपूर तालुक्यातील डाबक्यापाडा येथील मजुरांसोबत प्रदीप पावरा हा बोरगाव शिवारात एका ट्रक्टरच्या सहाय्यानं चालणाऱ्या कुट्टी मशीनवर मका कडबाची कुटटी करत असतांना, अचानक ट्रक्टरच्या कुट्टी मशीनमध्ये त्याचं डोकं अडकलं. त्यामुळं तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याचे काका सुनील पावरा यांनी त्याला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. या ठिकाणी डॉ. अमोल जैन यांनी प्रदीप पावरा याला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी वॉर्डबॉय शिवाजी पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यानं अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.