मातीच्या भांड्यावर 25 टक्क्यांनी वाढ; कच्च्या मालाचे भाव वाढल्याने माठ आणि रांजण महागले

मातीच्या भांड्यावर 25 टक्क्यांनी वाढ; कच्च्या मालाचे भाव वाढल्याने माठ आणि रांजण महागले
  • MG News
  • फेब्रुवारी 22 2025

Share on  

गरीबाचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ आणि रांजण यांची किंमत यावर्षी जवळपास 25 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीची भांडी बाजारात दाखल झाली आहेत. दरवर्षीच बुलढाण्यात मातीच्या रांजण, माठ, घागरी याची मोठी मागणी पाहायला मिळत असते. मात्र, यावर्षी कच्च्याम मालाच्या किमती वाढल्याने या भांड्यांमध्ये देखील 25 टक्क्याने भाव वाढ झाली आहे. यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी थोडी कमी झाल्याच चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
 

संबंधित बातम्या