टिप्पर चालकाने पुलांचं काम करून झोपलेल्या मजुरांच्या लोखंडी शेडवर टिप्परमधील वाळू टाकलीय.या वाळूचं वजनाने टिनपत्र्याचे शेड अंगावर कोसळून 5 कामगारांचा झोपेत असतानाच मृत्यू झालाय.जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातल्या पासोडी-चांडोळ रोडवर मध्यरात्री उशिरा ही घटना घडलीय.आज भल्या पहाटे कामगार तातपुरता निवारा करून राहत असलेलं शेड आढळून न आल्यानं ही घटना उघडकीस आलीय.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढलंय.या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.