उबाठा गटाची 70 टक्के मतं फतव्यातून, राज ठाकरेंना मान्य आहे का? केसरकरांचा खडा सवाल

उबाठा गटाची 70 टक्के मतं फतव्यातून, राज ठाकरेंना मान्य आहे का? केसरकरांचा खडा सवाल
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

उबाठा ची 60 ते 70 टक्के मत ही फतव्यातून येतात. ते जर राज ठाकरेंना मान्य असेल तर त्यावर आम्ही काय बोलावं. बाळासाहेबांनी कधी काँग्रेस सोबत तडजोड केली नाही. पहिलं काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात आणा. आणि मग दोघे एकत्र आले तर सगळ्यांना आनंद होईल. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे असं संजय राऊत म्हणाले होते त्यावर दिपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलीये. पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर बोलत होते

यावेळी त्यांनी आपल्या राजकीयस निवृत्ती बाबत देखील सांगितले आपल्या राजकीय निवृत्तीबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, नवीन युवकांना संधी देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. पुढील काळात आमदारकी नाही तर राज्यसभा किंवा विधान परिषद लढवण्याची आपल्यात ताकद असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे, काही दिवसांपूर्वी दिपक केसरकर यांनी आपण राजकीय निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते मात्र ते वक्तव्य मी गमतीने केले होते असे सांगताना केसरकर यांनी पुन्हा एकदा युटर्न घेतला आहे.

संबंधित बातम्या