जानेवारी महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील लालपरीची 77 लाखाची कमाई

जानेवारी महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील लालपरीची 77 लाखाची कमाई
  • MG News
  • मार्च 9 2025

Share on  

 

 गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगार हा शहरी भागात सोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक करत असतो आणि नेहमीच महाराष्ट्रामध्ये  उत्पन्नाच्या बाबतीत गोंदिया जिल्ह्यातील लालपरी समोर असते. एकट्या जानेवारी महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील लालपरीने 4 करोड 33 लाख 40 हजार रुपये कमावले असून कर्मचाऱ्यांचे वेतन, बस दुरुस्ती आणि इतर साहित्य यांच्यावर जवळपास 3 करोड 56 लाख 11 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, सर्व खर्च कापून एकंदरीत या लालपरीने एका महिन्यातच 77 लाखाची कमाई केल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे म्हटले जाते. परंतु, याला अपवाद म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील लालपरी आहे ज्यांनी एका महिन्यातच 77 लाख रुपये कमावले आहेत.
 

संबंधित बातम्या