मुंबईत तब्बल 639 कोटी रुपयांचं घर खरेदी; फ्लॅट खरेदी करणारी मालकीण कोण?

मुंबईत तब्बल 639 कोटी रुपयांचं घर खरेदी; फ्लॅट खरेदी करणारी मालकीण कोण?
  • MG News
  • जून 1 2025

Share on  

मुंबईत तब्बल 639 कोटी रुपयांचं घर खरेदी; फ्लॅट खरेदी करणारी मालकीण कोण?
 मुंबईत तब्बल 639 कोटी रुपये किमतीच्या घराचीखरेदी झाली आहे. वरळी सिफेस इथे निर्माणाधीन असलेल्या नमन झायना या इमारतीमध्ये अल्ट्रा लक्झरी असलेल्या 32 आणि 35 मजल्यावर असलेल्या डुप्लेक्स फ्लॅट्स ची खरेदी उद्योजिका लीना गांधी तिवारी यांनी केली आहे. याचा प्रॉपर्टी टॅक्स हा ही तब्बल 63.9 कोटी इतका आहे.

वरळी येथील दोन सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट हे एकूण 22,572 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे अपार्टमेंट वरळी सी फेसवरील 40 मजली इमारातीत आहेत. 32व्या आणि 35व्या मजल्यावरील दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंटमध्ये अलिशान सोयी सुविधा उपलब्ध आहेत.घराची किंमत तब्बल 639 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये तब्बल 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी लागणार आहे. कार्पेट एरियाच्या आधारावर याची किंमत 2.83 लाख प्रति चौरस फूट इतकी प्रचंड आहे.
लिनातिवारी भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. फोर्ब्सच्या मते, 29 मे 2025 पर्यंत लिना गांधी यांची रिअल-टाइम नेट वर्थ $3.9 अब्ज आहे. ती सध्या जगातील 964 व्या श्रीमंत व्यक्ती आहे. 2023 मध्ये, फोर्ब्स इंडियाने तिला 45 व्या श्रीमंत भारतीय महिला म्हणून यादीत नोंद केली होती.

संबंधित बातम्या