अधोरेगा फाऊंडेशनची दमदार सुरुवात...

अधोरेगा फाऊंडेशनची दमदार सुरुवात...
  • MG News
  • मार्च 31 2025

Share on  

अधोरेगा फाऊंडेशनची दमदार सुरुवात...


नाशिक : नाशिकमध्ये अधोरेगा फाऊंडेशनने ' सेतू प्रकल्प - बांधूया सेतू, ज्ञानाचा, जागृतीचा' याf उपक्रमाद्वारे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे काही उपक्रम गेल्या वर्षभर राबवीले. यातील सर्व शिक्षकांचा  अभिनंदन सोहळा  मनपा शाळा क्र. १८, आनंदवल्ली येथे आज संपन्न झाला.  या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर राबवलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा गौरव करण्यात आला.


प्रेरणा आणि ध्येय:

संघ विचारधारेतून प्रेरित होऊन _*समाजाचे ऋण फेडण्यासाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना अनुसरून अधोरेगा फाऊंडेशनची स्थापना झाली. चार काटके  जमवुन घरटी बांधून चुल  आणी मुल असा संसार तर  पक्षी देखील करतात"*संसाराचा काही उदात्त हेतु असावयास पाहीजे.  या सावरकरांच्या विचाराप्रमाणे, केवळ सांसारिक जीवनापुरते मर्यादित न राहता, समाजासाठी काहीतरी योगदान देणे हे फाऊंडेशनचे ध्येय आहे.


कार्यक्रमातील विशेष: या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द अस्थी रोख तद्नय  व श्रीगुरुजी  रुगणालय यांचया मार्फत राबविल्या जाणाऱ्या विवीध  सेवा कार्ययाचे प्रमुख श्री राजेंद्र खैरे  हे होते  त्यांनी उपस्थीनां मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच मनपा शाळा क्र. १८ च्या मुख्याध्यापिका सौ. अनिता संजय जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण सहकार्य केले. अधोरेगा फाऊंडेशनच्या 'सेतू प्रकल्पा'द्वारे दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवले जातात आणि अनेक सेवाभावी शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते.
सेवाभावी शिक्षकांचे योगदान: या वर्षी या उपक्रमांतर्गत   मयुरी पवार आणि निर्मला चौधरी (मुंजे इन्स्टिट्यूट) यांनी १२० विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले, युवराज पाटील सरांनी उंटवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना गणित हा किचकट विषय सोपी करुन शिकविला तसेच त्याचे महत्त्व पटवून दिले, रानडे सरांनी मनपा शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांना बासरी वादन शिकवले, या सर्वांचा सत्कार अधोरेगा फौडेशन तर्फे करण्यात आला.  तसेच सौ. प्रतिभा देवरे मॅडम यांनी मनपा शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमितपणे मार्गदर्शन केले त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांचे सातत्य आणि सेवाभावी योगदान हे वाखाणण्याजोगे होते.

 
प्रकल्पाला मिळालेले सहकार्य:

या प्रकल्पाला दामले पती-पत्नी, पुण्याचे कोठारी सर यांनी आर्थिक आणि इतर मदत केली. मनपा शाळा क्र. १८ च्या १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके वाटण्यासाठी अनेक दानशूरांनी मदत केली. कोठारी सर आणि स्वप्नील माशाळकर यांच्या मदतीने २००० विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखवण्यात आला. नागपूर शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले कु. वेदांची कुळकर्णी,  कु गायत्री शिरोळे व अश्विनी  तांबोळी ह्या  कार्यात नेहमीच तत्पर असतात. आणि सल्लागार समितीतील सदस्यांनीही मोलाचे सहकार्य केले.
 

संबंधित बातम्या