नाशिकहुन अक्कोलकोटला आता ४ तासात पोहोचता येणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवाशाला ९तास लागतात.चेन्नई ते सुरत द्रुतगती मगामार्गीतील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट महामार्ग बीओटी तत्वावर बांधण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतल्याने हे शक्य होत आहे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून १ हजार २७१ किमीचा चेन्नई ते सुरत द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून जात आहे. सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कलबुर्गी, कुरनूल, कडप्पा आणि तिरुपती अशा शहरांना जोडणार आहे. सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे या महामार्गाचे मुख्य दोन टप्पे असून दोन टप्प्यात आणखी काही टप्पे आहेत. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक-अक्कलकोट द्रुतगती महामार्ग होय . हा ३७४ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकेचा हा महामार्ग बांधण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी राष्टिय प्राधिकरणाकडून हायब्रिड माॅडेलनुसार निविदा काढण्यात आल्या.
मात्र ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे पुढे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने नुकतीच नाशिक-अक्कलकोट महामार्गाला मान्यता दिल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प बीओटी तत्वावर राबविण्यासाठी मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.