श्रीराम मंदिरानंतर आता सीतामाईंचे मंदिर

श्रीराम मंदिरानंतर आता सीतामाईंचे मंदिर
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

प्रदिर्घ संघर्षानंतर अयोद्वेत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर आता केंद्र सरकारकडून भव्य  सीतामाईंचे मंदिर उभारण्यास सुरवात करण्यात येणार आहे. बिहारमधील सीतामढी येथील पुनौरा धाममध्ये हे मंदिर उभारण्यात येणार आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीतामढी येथील पुनौरा धाममध्ये ८ ऑगस्ट रोजी भूमिपूजन करणार आहेत.

मार्च २०२५ रोजी अहमदाबाद येथे आयोजित "शाश्वत मिथिला महोत्सव २०२५"मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, श्रीराम मंदिर तयार झाले आहे. आता सीतामढीमध्ये भव्य सीता मंदिराच्या उभारणीची वेळ आली आहे. अमित शहा यांच्या घोषणेनंतर बिहार सरकारने पुनौरा धामच्या विकासासाठी ८८२ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती. त्यानुसार आता या मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. सीतामढी हे सीतेचे जन्मस्थान समजण्यात येते.

संबंधित बातम्या