बुलढाण्यात खरिपाच्या पेरणीसाठी ग्रामीण भागात शेती मशागतीला आला वेग

 बुलढाण्यात खरिपाच्या पेरणीसाठी ग्रामीण भागात शेती मशागतीला आला वेग
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

 बुलढाण्यात खरिपाच्या पेरणीसाठी ग्रामीण भागात शेती मशागतीला आला वेग

 बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 20 ते 22 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली होती.आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे.  खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे हातचा गेला. त्यात सोयाबीन कापूस यासह विविध पिकांना कवडीमोल दर मिळाला आहे.पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगामसुद्धा गारपिटीने भुईसपाट केला. उन्हाळी हंगामातील कांदा, गहू, हरभरा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. या झालेल्या नुकसानीची शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यातच आता खरीपाच्या पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

संबंधित बातम्या