वडिलांवर जे तीन गुन्हे दाखल केले आहेत ते सगळे खोटे आहेत. :पवन लोढा

वडिलांवर जे तीन गुन्हे दाखल केले आहेत  ते सगळे खोटे आहेत. :पवन लोढा
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

मंत्री  गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांचं हनी ट्रॅप हे षडयंत्र आहे, त्यांनी आपल्या वडिलांना अडकविले आहे,आपल्या वडिलांवर जे तीन गुन्हे दाखल केले आहे, ते सगळे खोटे आहेत. हे जर हनी ट्रॅप प्रकरण असते तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो. हा सगळा प्रसिध्दी साठी केलेला स्टंट आहे असे प्रतिपादन पवन लोढा यांनी केले.सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकारातील संशयित प्रफुल्ल लोढा यांचे पवन हे सुपुत्र आहेत.प्रफुल्ल लोढा प्रकरणात कुटुंबियांची बाजू ते मांडत होते.

आमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुम्ही कोणतीही चौकशी करू शकतात, आमच्याकडे काहीही नाही. मी आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, त्यांच्यावर लावण्यात आलेला ३०० कोटीचा दंड का रद्द झाला, खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी ही नेमली जायला हवी. मागील काळात आपल्या वडिलांमध्ये आणि गिरीश महाजन यांच्यात काही मतभेद झाले होते. मात्र, ते एकनाथ खडसे  आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले होते पण, ते आता दूर झाले आहेत, असेही पवन लोढा यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या