अमरावती:  नागपंचमीच्या दिवशी अमरावतीत हॉकर्स संघटनेचे 'मीठ भाकर आंदोलन'

अमरावती:  नागपंचमीच्या दिवशी अमरावतीत हॉकर्स संघटनेचे 'मीठ भाकर आंदोलन'
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरातील युवास्वाभिमान हॉकर्स संघटना व इतर हॉकर्स बांधवांनी गाडगे महाराज समाधीस्थळी नागपंचमीच्या दिवशी 'मीठ भाकर  आंदोलन' करत आपला आवाज उठवला. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले आहेत.त्यांच्यावर  उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. हातगाडी व फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या या नागरिकांनी आपल्या हातात भाकरी व त्यावर मीठ घेऊन शांततेत निषेध नोंदवला.
आम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्थायीक व कायदेशीर जागा मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आंदोलनादरम्यान त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या धोरणांवर नाराजी व्यक्त  करत मनपा विरोधात घोषणाबाजी केली आणि तत्काळ तोडगा काढण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या