मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कसं खोटं बोलत आहे ते सांगायचं आहे मुख्यमंत्री म्हणतात की दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू, पण त्यांनी निवडणुकीच्या आधी सातबारा कोरा करू असं म्हटलं होतं,पण त्यापासून ते दूर झाले. सरकारने दहा टक्के शेतमालाची खरेदी ही हमीभावाने केली मग इतर शेतकऱ्यांना कमी भावाने माल विकावा लागला. मुख्यमंत्री जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने बोलत आहे हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नाही. तुम्ही जर दुष्काळाची वाट पाहत असेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीही नाही,आमचे मुख्यमंत्री दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही असं सांगून जात असेल तर शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची वाट पहावी का? असे प्रतिपादन बच्चू कडू यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी नाहीतर पुढचं आंदोलन कसं राहील हे आम्ही आज चार वाजता ठरवू,आणि पुढच्या आंदोलनच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर मध्येच आम्ही घेरण्याचा प्रयत्न करू,आंदोलन करून सोडणार नाही तर जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमचा आंदोलन सुरू राहील, असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.