अमरावती : महानगरपालिका कार्यालयावर युवा स्वाभिमान हॉकर्स संघटनेचे आंदोलन

अमरावती : महानगरपालिका कार्यालयावर युवा स्वाभिमान हॉकर्स संघटनेचे आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

अमरावती शहरात सध्या मनपाची अतिक्रमण कारवाई वेगाने सुरु आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशाने   शहरातील अतिक्रमण धारकांना  महानगर पालिकेची  नोटीस बजावण्यात येतात. त्यानंतर मात्र थेट पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाई मोहीम राबविली जात आहे  या कारवाईच्या विरोधात युवा स्वाभिमान हॉकर्स संघटनेच्या मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला. रस्त्याचा कडेला जे हॉकर्स जे आपली उपजिवीका चालवतात त्यांचा तसेच  अन्य विविध स्थानिक प्रश्नांबाबत फलक आंदोलकांनी हातात धरले होते. 

आंदोलनादरम्यान  कार्यकर्त्यांनी घोषणा देत महानगर पालिकेचा निषेध केला.  मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी तातडीने अतिक्रमविरोधी मोहिम थांबवावी, मागणी यावेळी करण्यात आली. जर मोहीम थांबवली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला

संबंधित बातम्या