एअर इंडीयाचे विमान मुंबई विमानतळावर धावपट्टीवरुन घसरले.

एअर इंडीयाचे विमान मुंबई विमानतळावर धावपट्टीवरुन घसरले.
  • MG News
  • जुलै 21 2025

Share on  

कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान ए आय २७४४  धावपट्टीवर उतरल्यावर घसरले. मुसळधार पावसामुळे अपघात घडल्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, हवामान खराब असल्यामुळे धावपट्टीवर उतरल्यावर, काही क्षणातच विमानावरील नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून घसरले.

 विमान धावपट्टीवर उतरत असताना, तीन टायर फुटल्याची माहिती आहे. तसेच इंजिनलाही काही प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वैमानिकच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असून, पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या