नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये कालिदास कला मंदिरासमोरील.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण व नवीन पुतळा बसवण्यासाठी वारंवार लेखी व तोंडी निवेदन देऊन सुद्धा.
नाशिक महानगरपालिका यांच्याकडून दिरंगाई होत असल्याकारणाने
सकल मातंग समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा अधिकारी येथे महानगरपालिका विरोधात निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या.
मागील काही वर्षांपूर्वी सदरच्या पुतळ्यावर झाड पडून पुतळ्याचे नुकसान झाले होते. या संदर्भात पत्रव्यवहार करून धुळे येथे महानगरपालिका नाशिक यांच्या वतीने नवीन पुतळा तयार करण्यात आला.
मात्र महानगरपालिका यांच्या वतीने हा पुतळा बसविण्यात विलंब होत असून. पुतळ्याच्या परिसराचे शुशोभीकरणाचे भूमिपूजन ही झालेले नाही. प्रशासनाकडून नवीन पुतळा बसवण्यासाठी कुठलीही कारवाई होत नसल्याकारणाने.
अखेर गुरुवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकल मातंग समाजाच्या चे पदाधिकारी संतोष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून घोषणा देण्यात आला.तसेच निवासी डेप्युटी कलेक्टर राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी अशोकराव साठे. गोपाळराव बस्ते. दिनकरराव लांडगे. बाळासाहेब शिरसाठ. भारत जाधव. यांच्यासह सकल मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते......