जातीभेदाच्या भिंती गाडून नव्याने समाजव्यवस्था उभी करण्यासाठी "बहुजन जोडो जिजाऊ रथयात्रा" मोलाची भूमिका बजावणार  : महसूल आयुक्त प्रविण गेडाम

जातीभेदाच्या भिंती गाडून नव्याने समाजव्यवस्था उभी करण्यासाठी
  • MG News
  • एप्रिल 25 2025

Share on  

जातीभेदाच्या भिंती गाडून नव्याने समाजव्यवस्था उभी करण्यासाठी "बहुजन जोडो जिजाऊ रथयात्रा" मोलाची भूमिका बजावणार  : महसूल आयुक्त प्रविण गेडाम

 

जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कालिका मंदिर येथे आयोजन

 समतेचा आणि ममत्वाचा संदेश देणारी सामाजिक सलोखा जपत राजमाता जिजाऊंच्या कल्पनेतील स्वराज्य खऱ्या अर्थाने समाजात नांदावे,अठरापगड जातीतील समाज गुण्या गोविंदाने रहावा यासाठी जातीभेदाच्या भिंती गाडून नव्याने समाजव्यवस्था उभी राहीली यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा बहुजन जोडो जिजाऊ रथयात्रा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुका डॉ.प्रविण गेडाम यांनी केले.
    संपूर्ण राज्यभरातून प्रवास करून राजमाता जिजाऊ रथयात्रा नाशिक शहरात दाखल झाली. संपूर्ण नाशिकभर जिजाऊ रथयात्रेचे जोरदार स्वागत झाले. दुसऱ्या दिवसाच्या शुभारंभ प्रसंगी कालिका मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ.गेडाम प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी कालिका मंदिर संस्थांन च्या वतीने केशव आण्णा पाटील यांनी डॉ.गेडाम यांचा सत्कार केला.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक व जिजाऊ रथयात्रेचे संयोजक प्रा.अर्जुनराव तनपुरे यांनी मराठा सेवा संघ सातत्याने विविध उपक्रम करून बहुजनांना जोडण्याचे काम करत आहे सध्याच्या परिस्थितीत जाती जाती तणाव निर्माण करण्याचे काम काही विघ्न संतुष्ट करत आहे यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.मराठा सेवा संघाच्या विविध उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन ही यावेळी तनपुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दीपक भदाणे यांनी मराठा सेवा संघाची भूमिका मांडली.
यावेळी महसुल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ रथाचे पूजन करण्यात आले.
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे,जिल्हा ग्रामिण प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे,जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ,मुख्य अभियंता राजेश मोरे,जिल्हा परिषदेचे कॅफो मारुती मुळे,जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय शेवाळे, माजी पोलीस उपायुक्त नवलनाथ तांबे,जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विजयकुमार हळदे,मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप थेटे,उत्तमराव गांगुर्डे,कर्मचारी बँकेचे संचालक प्रमोद निरगुडे,जयंत शिंदे,पतसंस्थेचे संचालक अमोल बागुल,किशोर अहिरे,मराठा समन्वयक नितीन सुगंधी ,मराठा आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे,विजय सोपे,जिजाऊ ब्रिगेडच्या मा.प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे,प्रदेश सदस्य सुमन हिरे जिल्हाध्यक्ष कल्पना रेवघडे,महानगर प्रमुख स्मिता शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष योगिता सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष संगीता पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनवणे,विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,राजेंद्र निंबाळते,नितीन मगर,विजय देशमुख,अशोक दुधारे,भाऊसाहेब पाटील,सुनील गायकवाड,रवींद्र शिंदीकर,इंजि.केतन पवार,इंजि.प्रमोद अहिरराव,इंजि.जितेंद्र कर्मचारी संघटनेचे एकनाथ वाणी,राजेंद्र चव्हाण,संजय राव,यादव बोराडे, वाल्मीक मोकळ,बबन भोसले, गृहनिर्माण कक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ,विकी गायधनी,सचिन मोरे तसेच कालिका मंदीर संस्थानचे डॉ.प्रतापराव कोठावळे,दत्ता पाटील,सर्व पदाधिकारी उपस्थित होते.आभार राजेंद्र निंबाळते यांनी मानले.

संबंधित बातम्या