बीड:  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचे  उद्घाटन 

बीड:  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचे  उद्घाटन 
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

बीड शहरात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन  करण्यात आले.श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज हे या सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे,आणि याच उद्देशाने मराठवाड्यातील बीडमध्ये उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. 
   बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून महामंडळाचे महत्त्व आणि पुढील कामकाज अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सादर केले. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.  महामंडळाच्या कार्यालयासाठी अनेक अडचणी आल्या. मात्र त्यातून मार्ग काढत मराठा समाजातील तरुणांसाठी कार्यालयाची उभारणी करण्यात आल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या