महावितरण विभागाचा अजब कारभार; वीज जोडणी नसताना प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवले 90 हजारांचे बिल

 महावितरण विभागाचा अजब कारभार; वीज जोडणी नसताना प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवले 90 हजारांचे बिल
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

 महावितरण विभागाचा अजब कारभार; वीज जोडणी नसताना प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवले 90 हजारांचे बिल

 बीडमध्ये महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने आरोग्य केंद्राला 90 हजारांचे वीज बिल पाठविले आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीजपुरवठा नाहीये.

बीड तालुक्यातील च-हाटा येथे आठ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. सुरुवातीपासूनच वीज जोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. या इमारतीला वीज जोडणी व्हावी. याकरिता अनेक आंदोलन झाली. त्यानंतर दहा लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. परंतु इमारतीला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला 90 हजारांचे विज बिल पाठविले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने आरोग्य अधिकारी देखील चक्रावले आहेत.
 

संबंधित बातम्या