महादेव मुंडे खून प्रकरणातील पुराव्यांची फाईल घेऊन सामाजिक कार्यकर्ते विजय सिंह बांगर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या खूनाचा शवविच्छेदन अहवाल, क्रूर हत्येचे फोटोज, FIR आणि आतापर्यंत देण्यात आलेले निवेदन या सर्वांची फाईल जरांगे पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवली जाणार आहे. महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जावी या मागणीसाठी परळीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जरांगे पाटील यांनी सहभागी व्हावे, यासाठी यावेळी जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली.