गेल्या 38 वर्षांपासून सुरु असलेली कोल्हापूर खंडपीठाची मागणी आता जोर धरताना दिसून येत आहे. त्यामुळेच कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील-चूयेकर यांनी 16 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणी संदर्भात लेखी आश्वासन आणि कार्यवाही सुरू केल्याशिवाय उपोषण मागं घेणार नसल्याचं माणिक पाटील-चुयेकर यांनी सांगितल आहे.