राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुडी उभारून निषेध करण्यात आला. यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगुले, प्रकाश मिरजकर, अजित हळीगले, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजोबा, सर्जेराव पवार, बाबासो संदे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचोरे, शशांक पाटील, विजयकुमार पाटील आदिसह अन्य शेतकरी उपस्थित होते.