नाशिक:
उप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात दोघा भावांची धारदार शस्त्राने निघृण हत्या करण्यात आल्याने उपनगर परिसरासह शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकर वाडी, बोधले नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव, ३२ आणि प्रशांत भगवान जाधव ३० या दोघा भावांची संशयित सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्व रा. आंबेडकर वाडी, नाशिकरोड यांनी पूर्व वैमन्यासातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणून बुधवार दि. १९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांचा आणि लोखंडी रॉडचा वापर करून निघृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ पळ काढला. पोलिसांची चार पथके आरोपींचा शोध घेत आहेत.