बुलढाणा शहराला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात अस्वल, बिबट यासारखे अनेक हिस्त्र प्राणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे बऱ्याचदा या वन्य प्राण्यांचा शहर परिसरात वावर पाहायला मिळतो. मंगळवारी सकाळी बुलढाणा शहरातील बालाजी नगर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अस्वल मुक्त संचार करत असल्याचे आढळून आले. काही दिवसांपूर्वी तब्बल चार बिबट म्हाडा कॉलनी परिसरात आढळून आले होते. या परिसराला जंगल लागून असल्याने प्राण्यांचा अधिवास आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.