बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात रोहन संतोष पैठणकर या दलित युवकाला २३ जुलै महिन्याच्या रात्री बसस्थानकाजवळ उभा असताना, माराहाण केल्याची घटना घडलीये. गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत गोपाल संगेले असे माराहाण करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत दोघांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून काँग्रेस भवनाजवळ नेले आणि दगडाने बेदम मारहाण केली. तसेच त्यांनी त्याचे कपडे प्रयत्न केला. रोहनने माफी मागूनसुद्धा त्यांनी मारहाण थांबवली नाही. त्याच्या अंगावर गायी सोडल्या आणि याचा व्हिडिओ शूट केला. नंतर पुन्हा त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून घाटपुरी नाक्याजवळील मोकळ्या मैदानात नेऊन लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. तेव्हा रोहित पगारिया नावाचा त्यांचा मित्र तिथे आला आणि त्यानेसुद्धा रोहनला मारहाण केली. यानंतर इतर काही तरुणांनाही तिथे बोलावण्यात आले. रोहनने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी त्याला विचारत होते की “इम्रान कोण आहे?” आणि “हा गाय चोर आहे” असे म्हणून त्याला मारहाण करत होते. याच दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गब्बू गुजरीवाल, प्रशांत गोपाल संगेले आणि रोहित पगारिया यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.