लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेतातील वाहणारे पाणी पांग्रा डोळे गावात शिरले. त्यामुळे घरांतील साहित्याचे नुकसान झाले. शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होते. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकवेळा यासंदर्भात तक्रारी दिल्या, मात्र प्रशासनाकडून काहीही हालचाल केली जात नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरून घरांचे नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी, आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.