बुलढाणा :  शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बुलढाण्यात चक्काजाम आंदोलन

बुलढाणा :  शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बुलढाण्यात चक्काजाम आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

 शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर दुर्लक्षित घटकांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे बुलढाणा रोडवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको करत घोषणाबाजी केली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे खामगाव तालूकाध्यक्ष गणेश काकडे यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी, दिव्यांग ,ग्रामपंचायत कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या