बुलढाणा : जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 477 कोटीं मंजूर - मंत्री मकरंद पाटील

बुलढाणा : जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 477 कोटीं मंजूर - मंत्री मकरंद पाटील
  • MG News
  • मे 17 2025

Share on  

बुलढाणा : जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 477 कोटीं मंजूर - मंत्री मकरंद पाटील

        बुलढाणा जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 477 कोटीं मंजूर केला. मंजूर निधीचे व्यवस्थित नियोजन डीपीडीसीच्या बैठकीत केले. शाळा कॉलेजच्या दुरुस्त्या शाळा खोली नवीन बांधणे, अंगणवाडी नवीन बांधणे, मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर कस दिले जाईल. याकरिता जाणीवपुर्वक लक्ष घातल आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शंभर टक्के पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मुला मुलींची स्वच्छतागृहां संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला.

     पीक विमा हंगामात एकदाच मिळणार
   मुळामध्ये एकदा घेतलाय का असं नाही. मुळामध्ये एका हंगामामध्ये एकदाच नुकसान भरपाई देता येतील. हा GR पूर्वीच्या सरकारचा आहे.

    बुलढाणा जिल्ह्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात
  अशी कोणतीच तक्रार माझ्याकडे आली नाही. सकाळपासून माझ्याकडे जे निवेदन आले, त्या गावाचे प्रश्न सरपंच असतील कार्यकर्ते असतील ते निवेदन संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवून दिलेली आहे. योग्य त्या कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

  शरद पवार अजित पवार एकत्र येणार का
  ते एकत्र येतील का हा जर तर चा प्रश्न आहे. दादांनी या संदर्भात क्लिअर केलेल आहे की, या संदर्भातील प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यामुळे या चर्चांना काही महत्त्व नाही.

  पीक विमा
  पिक विमा संदर्भात आजच आमचा आढावा झाला. जिल्हा कृषी अधिकारी यांचे म्हणणं आहे की, जो काही पिक विमा राहिलेला आहे. तो लवकरात लवकर या ठिकाणी येईल.
 

संबंधित बातम्या