धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने धडक कामगिरी करीत एका चोरट्याला अवघ्या काही तासांतच अटक केली असून त्याच्याकडून 46 हजार 500 रुपयांची रोख रक्कम तसेच 5 हजार रूपयांचा मोबाईल व पाकीट जप्त करण्यात आले आहे.
या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सांगितले की, एका चोरट्याने विकास बन्सीलाल पाटील यांच्या गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिस पाठीमागील लाकडी दरवाजा तोडून 50 हजार रुपये रोख रक्कम तसेच मोटोरोला कंपनीचा मोबाईल त्याचबरोबर एक पाकीट चोरून नेले होते. या पाकिटात आधार कार्ड होते, असा एकूण 55 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच ह्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखवतात त्याने चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी यावेळी दिले.