CHH.SAMBHAJINAGAR | ११ प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये - सिताराम पवार
१० वी चा निकाल जाहीर झाला असून, सध्या अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गडबड सुरू आहे. सुधारित वेळापत्रकानुसार शिक्षण विभागाने २६ मे पासून पुन्हा नोंदणी सुरू केली असून, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ मे पासून सुरुवात झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. अर्ज भरताना विद्यार्थांना अडचणी येत असून अशा तक्रारी सध्या शिक्षण विभागाकडे येत आहेत. तांत्रिक अडचणी सोडवणार आहोत, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.