- एमआयडीसी वाळूज परिसरातील संतोष लड्डा यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून कोट्यावधीच्या सोन्या-चांदीच्या दागिण्यांची लूट केली होती. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने पाच आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता. रात्री अकरा -सव्वा अकराच्या दरम्यान पोलिसांनी हॉटेल साई गार्डनच्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता थेट आरोपीनी गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्याला ही जखमी केले .त्यास प्रत्युत्तर म्हणून आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करत एन्काऊंटर केला.