शहीद जवानाच्या स्मारकसाठी जागा उपलब्ध करूनद्यावी मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांची मागणी
चोपडा शहरातील गुजरअळी भागात राहणारा वीर जवान चेतन चौधरी हे मणिपूर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले. या शहीद जवानाचे स्मारक चोपडा शहरात व्हावे यासाठी शहीद जवान यांचे वडील व मित्र परिवाराने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राहुल पाटील यांची भेट घेऊन वीर जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी मागणी केली. सदर मुख्याधिकारी यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने शहीद जवान याच्या मित्र परिवाराने समाधान व्यक्त केले.