नवापूर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह घेऊन नागरिकांचे ठिय्या आंदोलन

 नवापूर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह घेऊन नागरिकांचे ठिय्या आंदोलन
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

 नवापूर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह घेऊन नागरिकांचे ठिय्या आंदोलन

 नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे राहणारे धीरजलाल पटेल हे मागील 21 एप्रिल पासून लापता होते. नवापूर शहरातील शिवम कन्स्ट्रक्शन येथे काम करीत असताना 15 लाख रुपये चोरीचे आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र आता धीरजलाल पटेल यांच्या मृतदेह सेलवासा येथे एका नदीपात्रातून आढळून आला असून नवापूर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात ठिय्या मांडून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. 

मयत धीरजलाल पटेल यांचा मुलगा ध्रुव पटेल हा वडिलांची मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्यात आला असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केले असल्याचे आरोप करत पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी मयत धीरजलाल पटेल यांचे शव घेऊन परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नवापूर पोलीस ठाण्यासमोर जमले होते मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मयत धीरज पटेल यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी परिवार व ग्रामस्थ तयार झाले आहे.


 मात्र धीरजलाल पटेल यांच्या मृत्यू मागच्या कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखित व्हावे अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या