एसएमबीटीत एकाच दिवसात दोन क्लिष्ट तावी शस्रक्रिया यशस्वी

एसएमबीटीत एकाच दिवसात दोन क्लिष्ट तावी शस्रक्रिया यशस्वी
  • MG News
  • मार्च 20 2025

Share on  

जागतिक महत्त्व यावर मार्गदर्शन करत असताना आंतरराष्ट्रीय करार करण्याबाबत प्रयत्न केले जातील.  नव-नवे तंत्रज्ञान, माहितीची देवान-घेवाण आणि प्रत्यक्ष अनुभव या बाबी लक्षात घेऊन पुढे वाटचाल होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर यांनी सांगितले.  

प्रा. यान कोवाच यांच्या एसएमबीटी हॉस्पिटलमधील भेटीनंतर सायंकाळी नाशिक शहरातील हृदयविकार तज्ञांसाठी विशेष सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरासह पंचक्रोशीतील ५० ते ६० हृदयविकार तज्ञ व हृदयविकार शस्रक्रिया तज्ञ व फिजिशियन्स उपस्थित होते. अद्ययावत तंत्रज्ञानाने काळानुसार उपचारप्रक्रियांत बदल करणे क्रमप्राप्त होत चालले असून एसएमबीटीने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे ज्ञानात भर पडत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या. 

चौकट
तावी शस्रक्रिया म्हणजे काय?
ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे.  ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते.

ग्रामीण भागातील अत्याधुनिक सुविधा पाहून आवाक
ग्रामीण भागात हॉस्पिटल असले तरी कनेक्टीव्हीटी या हायवेमुळे (समृद्धी महामार्ग) वाढली आहे.  अन्जिओग्राफी, अंजिओप्लास्टी, बायपास, डिव्हाइस क्लोजर अशा प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुविधा याठिकाणी मोफत उपलब्ध आहेत.  ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या प्रकारे असलेले कार्य खरच प्रेरणादायी आणि प्रशंसात्मक आहे. पैशांच्या किंवा बिलाच्या अभावी रुग्ण रुग्णालयातून परत जाऊ नये हा हॉस्पिटलचा उद्देश अभिमानास्पद आहे.
प्रा. यान कोवाच, जगप्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट

एसएमबीटीत ५० टक्के सवलतीत तावी शस्रक्रिया
एसएमबीटीचा हृदयविकार विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत हृदयविकार विभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी मोठे काम होत आहे. यावर्षी २०२५-२६ मध्ये तावी शस्रक्रीयांसाठी ५० टक्के सवलत दिली जात आहे. दिल्ली, मुंबई व पुणे सारख्या रूग्णालयापेक्षाही याठिकाणी उपचार खर्च हा ५० टक्के कमी आहे. उपचार कमी खर्चात करत असताना कुठल्याही प्रकारे रुग्णांच्या उपचारांचा दर्जा, गुणवत्ता यात तडजोड केली जात नाही. तसेच तावीसाठी वापरला जाणारा ईंडीजीनस वॉल्व्ह व त्याची गुणवत्ता खूप चांगली असून रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे.

संबंधित बातम्या