एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून वाटचाल करत असलेली ठाणे महानगरपालिका बदलते ठाणे या घोषवाक्य सह मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे याच ठाणे महानगरपालिकेला अनेक प्रश्न भेडसावताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून डम्पिंग चा प्रश्न असेल, महापालिकेत झालेल्या तिजोरीचा खडखड्यात आणि ठाणेकरांच्या विविध समस्या हे मुद्दे घेऊन सरकार आणि ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. ढोल वाजवत ठाणे मुख्यालयासमोर आंदोलन काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.