कॉन्स्टेबलची राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

 कॉन्स्टेबलची राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या
  • MG News
  • मे 3 2025

Share on  

येथील पोलिस स्थानकातील कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे (वय ४०, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि कोल्हापूर) यांनी शहरातील राहत्या घरी ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार काल (ता. १) रात्री ८. ३० वाजण्याच्या सुमारास घडला. श्री. शेटे हे गेल्या काही वर्षांपासून वैभववाडी पोलिस ठाणे  येथे सेवा बजावत होते.

मध्यंतरी त्यांची विजयदुर्ग स्थानकातही बदली झाली होती. त्यानंतर ते पुन्हा वैभववाडी स्थानकात आले. शहरातील एका गृहसंकुलात ते कुटुंबासह राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापुरातून जाऊन आले होते.

नेहमीप्रमाणे काल (ता. १) सायंकाळी त्यांची पत्नी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. त्यावेळी अनिल हे बेडरूममध्ये होते. बराचवेळ बाहेर न आल्याने पत्नीने हाक मारली; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पत्नीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.

संबंधित बातम्या