महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना शाखा तिरोडाच्या वतीने अदानी पावर लिमीटेडचे कंत्राटी कामगारांचे आज 20 मार्च 2025 पासून न्यायिक मागण्याकरिता आंदोलनांस प्रारंभ करण्यात आला. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी आंदोलनाच्या पुर्व संध्येला तिरोडा शाखचे संघटना पदाधिकारी व कामगार बांधवांना उपोषण स्थळी भेट देण्यात आली. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी तिरोडा येथील हजारो कामगारांच्या अडीअडचणी प्रलंबित असून कामगारांना न्यायिक मागण्याकरिता आंदोलन करावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहे. शासनाचे प्रचलीत वेतन व मूलभूत सोई सुविधा तिरोडा येथील कामगारांना संबंधीत कंत्राटदार अदा करित नसल्याचे अदानी व्यवस्थापनांस विविध लेखी पत्राद्वारे संघटनेने कळविलेले आहे. अदानी व्यवस्थापन कामगारांचे शोषण व पिळवणूक करित असल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे. कामगारांना लेखी निवेदनातील मागण्या जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत नियोजित आंदोलन सुरुच रहाणार आहे असा रोखठोक सवाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे यांनी व्यक्त केला.