नाशिकमध्ये मका चाऱ्यातून विषबाधा : ४१ म्हशी दगावल्या
नाशिक : येथील आडगाव परिसरातील पाटालगत असलेल्या रौंदळ दूध डेअरी यांच्याकडे असलेल्या ४१ म्हशीना मका चाऱ्याची कुटी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली आणि 41 म्हशी त्यात दगावल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मका वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी मकाला फवारलेल्या औषधातील पी एच हा ९० दिवसांनी मकातून कमी होतो परंतु शेतकऱ्यांनी त्या मकाची कुटी ६० दिवसात केल्यामुळे त्यात औषधातील पीएच शिल्लक राहिला आणि म्हशींना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला . यातील काही म्हशी आजारी आहे. यामुळे जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान या झाल्याचा अंदाज आहे.
याप्रकरणी चारा विकणारा शेतकरी आणि औषध विकणारा दुकानदार या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.