-७ महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
ओझर येथे नववाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून या महिलेचा मृतदेह घरासमोरील विहिरीत सापडला आहे.1 दिवस अगोदरच ही महिला बेपत्ता असल्याची ओझर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली होती.
मुलीच्या घरच्यांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.नवरा ,सासरा,सासू आणि नणंद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाvआहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सत्य समोर येणार असल्याचे पोलीस आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे.