अजित पवार, कर्जमाफी
- शेतकरी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय? हे समजून घेणे खुप महत्त्वाचे आहे
- शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही. अनेक उद्योगपतींचे उद्योग तोट्यात जातात. राष्ट्रीय पातळीवरच्या तेव्हा त्यांच्या राईट ऑफ नावाखाली कर्ज माफ केलें जातं. हजार कोटींचे कर्ज माफ केले जाते. कारण त्यांचा उद्योग तोट्यात जातात. आमचा शेती व्यवसाय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गेल्या तीन वर्षापासून भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन-कापूस पडून आहे. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्याच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेले आहेत. म्हणून कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे. सरकारनेच काय सगळ्या पक्षांनी सांगितलं होतं की, आम्ही कर्जमुक्ती करू. आता जे सरकार सत्य झालं त्यांनी दिलेला शब्द पाळावा. ही माफक अपेक्षा आहे
- सरकारने एखादा प्रोजेक्ट कमी करावा, शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा, अजून एखादा प्रोजेक्ट उशिरा करावा, अत्यावश्यक गोष्ट अशी की शेतकऱ्यांना जगवणे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणे खूप आवश्यक आहे. इतर योजनांच्या माध्यमातून आम्हाला भिकारी बनवता ते करण्यापेक्षा सोयाबीन, कापसाला शेतमालाला चांगला भाव द्या. तुमच्या त्या योजना चुलीत घाला. आम्हाला शेतमालाला चांगला भाव द्या आम्ही आयुष्यात तुमच्या दारात भीक मागायला येणार नाही.