धनंजय मुंडेंनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता-कल्याण काळे
धनंजय मुंडेंनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. त्यांचा राजीनामा घ्यायला राज्य सरकारला तीन महिने का लागले. असा सवाल उपस्थित करत जालन्याचे खासदार डाॅ कल्याण काळे यांनी राज्य सरकारवर टीका केलीये. नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही. तर मोठे आका छोटे आका. आणि त्यांच्यासोबतचे गुंड यांचं काय. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केलं पाहिजे. सरकार हे जनतेच्या पाठिशी आहे की मारामारी करणारे आरोपींच्या पाठिमागे आहेत. सरकारनं तसं सांगावं. ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे. की आपल्या मंत्रीमंडळातल्या एका सरकार्याला राजीनामा द्यावा लागतोय. असं म्हणत काळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवलाय..