धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळ बंद पडला होता. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खैरनार व इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आहे. . यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे.